Posts

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

  जून १९७६:   "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही.   परत थोड्यावेळाने फोन करा...."   जून २०२१:   "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही.   परत थोड्यावेळाने फोन करा...."   फोनच्या दोन कॉलमधे तब्बल ४५ वर्ष अंतर असूनसुद्धा भारतात फोनवर तोच संवाद ऐकू येतो (किंबहुना ऐकू येत नाही!). म्हणजे ४५ वर्षात काहीच सुधारणा किंवा बदल झाला नाही असं नाही. आज स्मार्टफोन घराघरात शिरला आहे. पण ४५ वर्षांपूर्वी, स्मार्टफोनचा मूळपुरुष - स्थितप्रज्ञासारखा एका जागी स्थिर असलेला - दणकट काळा फोन अजून घराघरात शिरला नव्हता. वीस-तीस घरांच्या वसाहतीत हा एखाद्याकडे विराजमान झालेला असायचा. सगळ्यांचे फोन आणि निरोप यावरून यायचे.   कनेक्शन न मिळणे, चुकीचा नंबर लागणे असे रंग-ढंग तो दाखवायचा. सगळ्यात जास्त रुसून बसायचा तो ट्रंककॉलच्या वेळी!   एक तर टेलिफोन एक्सचेन्जकडे ट्रंककॉलसाठी नोंदणी करावी लागत असे. त्यानंतर त्यांच्याकडून कधीही कॉल येईल म्हणून, ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे ताटकळत बसावे लागे. तासनतास वाट पाहिली तरी ट्रंक कॉलची लाईन मिळा...

छंदोपनिषद !

“घेई छंद मकरंद .....प्रिय हा मिलिंद ...मधुसेवनानंद स्वच्छंद ......!”    पंडित वसंतरावांचे स्वर कानी पडत होते.   ‘छंद’ या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. नकळत भूतकाळात जाऊन आपण केलेले विविध छंद आठवले. काही बालिश तर काही स्वानंद देणारे....पण काळाच्या ओघात अलगदपणे निसटून गेलेले. १९७७-८०च्या आसपासचा तो काळ. सुट्टीतल्या छंदवर्गांचं फॅड अजून आलं नव्हतं. पण अनेक छंद आमच्या घरात घर करून असत.   माझ्या आठवणीतला माझा पहिला छंद म्हणजे पक्ष्यांची पिसे जमविण्याचा. रस्त्यात मिळण्याऱ्या पक्ष्यांच्या पिसांना फारसा भाव नव्हता. चतुःशृंगीच्या जत्रेत विविध रंगांच्या पिसांच्या टोप्या मिळायच्या. अशी टोपी म्हणजे पिसांचे घबाडचं असे. पण सगळ्यात उठून दिसणारी पिसं मिळायची ती पक्षी संग्रहालयात. लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर एक पक्षी संग्रहालय होतं. तेथील रंगीबेरंगी पक्ष्यांची पिसं मी गोळा केली होती. त्यातलंच एक सप्तरंगी पीस मला फार आवडलं होतं. शाळेत एकदा ते मित्रांना दाखवायला नेलं. कर्णिक नावाच्या मित्राने ते त्याच्या घरी नेलं. आमची परीक्षा झाली आणि मग मला त्याची आठवण आली. त्यानेसुद्धा निकालाच्य...

बंद कुपीतील दारफळ

मराठीतील महाकवी "गदिमा' यांनी   "खेड्यामधले घर कौलारू" या गीतात खेड्याचं मोहक वर्णन केलं आहे. माझ्यासारख्या संपूर्ण शहरी माणसाच्या आयुष्यात आजपर्यंत खऱ्या अर्थाने एकच खेडं आलं आणि ते (किमान पक्षी त्यावेळेस) असं मनमोहक नक्कीच नव्हतं. गावाला वेस होती, पण गावात शिरणाऱ्या रस्त्याला दोन बाजूंना दोन चौकोनी खडक मांडले होते, तेच काय ती वेस आल्याची वर्दी द्यायचे. एकच एक रस्ता होता खरा पण त्याकाळी (७०-८० च्या दशकात) तो इतका कच्चा होता की धुळीने तो सदैव माखलेला असायचा. पार आणि चावडी असली तरी ती बहुतेकदा ओसाड असायची. पोरांनी पोरींवर लाईन मारावी इतके तिघेही (पोरं, पोरी आणि खेडं) पुढारलेले नव्हते. नदी होती, पण हा भाग (की अभागी भाग) कायम दुष्काळाच्या गर्तेत असल्याने त्याला पाणी आलेलं मला तरी आठवत नाही. त्यापुढे जाऊन विजेचा   लपंडाव पाचवीला पुजलेला. त्यामुळे अंधार झाला की आहे तिथे स्वस्थ बसायची शिक्षा असायची. अशा खेड्यात मोहक आणि रोमॅंटिक ते काय वाटणार ? पण चाळीस वर्षे मागे वळून   पाहताना त्यातील मजा काळाच्या ओघात कशी हरवून गेली याची जाणीव हुरहूर लावून जाते. दारफळ - महारा...

शब्दांजली

प्रस्तावना पु . ल . जाऊन १९ वर्षे झाली .   त्यांच्या जाण्याने मनात एक पोकळी निर्माण झाली होती . एका तिरीमिरीत माझ्या मनातील भावना मी लिहून काढल्या - ती ही " शब्दांजली ". मी कोणी लोकप्रिय साहित्यिक किंवा सेलिब्रिटी नव्हतो ( आजही नाहीये ) की ही कुठे छापून यावी . ब्लॉग वगैरेचा जमाना अजून सुरु झाला नव्हता . क्षितिजावर समाज माध्यमे उगवली नव्हती . त्यामुळे ही शब्दांजली कुटुंबाला दाखवण्यापुरती राहिली . आज पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याची आठवण आली आणि ही “ शब्दांजली” ब्लॉग रूपाने प्रसिद्ध करत आहे . (८ नोव्हेंबर २०१९) ---------------------------------------------------------------------------------------------------------------- शब्दांजली १२   जून २००० ……….“ पु . ल .”   अनंताच्या प्रवासाला निघून गेले तो दिवस !   असा प्रवास ज्याचे प्रवासवर्णन ते लिहिणार नाहीत . गेली कित्येक दशके तमाम मराठी रसिकांना खदखदून हसवणारे  ' पु . ल .' , जाताना मात्र सगळ्यांचे डोळे ...

मुंबई पुणे मुंबई

महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक भावविश्वात पुणे -मुंबई प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या   काही दशकात मराठी माणूस अमेरिका , यूरोप आणि इतरत्र जगभर फिरू लागला तरी पुणे-मुंबई प्रवासाची सर त्याला नाही. उगीच नाही   वसंत बापटांनी   "दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत" ही कविता लिहिली ज्यात या प्रवासाचे समर्पक वर्णन केले आहे. माझे आजोळ मुंबई ! त्यामुळे हा प्रवास म्हणजे माझ्या बालपणापासून आजपर्यंत सख्खा सोबती आहे. बालपण, तारुण्य आणि आता मध्यमवय   असा माझा प्रवास पुणे मुंबई रस्त्यावरून होत गेला म्हटले तर अतिशयोक्ती नाही.  कळायला लागल्यापासून मला या प्रवासातील एकेक मैलाचा दगड पाठ आहे. सकाळी ...नव्हे पहाटे ...उठून सहाची जनता एक्सप्रेस (तेव्हा तिचे 'सिंहगड’ असे नामकरण झाले नव्हते) पकडायची.   बहुतेक वेळेस बाबा स्टेशन वर सोडायला यायचे. आईबरोबर मी आणि धाकटा भाऊ संजय अशी आमची प्रवासी टीम असायची.   गाडी सुटली की शिवाजीनगर, खडकी गेलं की पुढची स्टेशन्स झोपेत निघून जायची.   लोणावळा चिक्कीचे विक्रेते येऊन झोपमोड करायचे. खंडाळा...

बदलता काळ !

TIME या नियतकालिकाने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांच्यावर दोन विरुद्ध विचांराचे लेख प्रसिद्ध केले.   निवडणूक शेवटच्या टप्प्यात   आली असताना "मोदी म्हणजे देशाचे विभाजन कर्ते" असा पहिला लेख होता. निवडणुकीतील यशानंतर "मोदी देशाला एकसंध जोडणारे" असा दुसरा लेख होता.   "Time   has changed" असे उपहासात्मक संदेश व्हाट्सअप वर फिरू लागले.   पण तसा विचार केला तर time   म्हणजे काळ खरंच बदलला आहे.    ‘आता काळ बदलला आहे’ हे वाक्य लहानपणापासून कानावर पडत आले आहे. कालानुरूप आपण बदलले पाहिजे हेसुद्धा   तितकेच खरे आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बहुतेक प्रत्येकाला येतो.   पण काही बाबतीत काळ आणि   वेळ हे समानार्थी आहेत.   मला वाटणारा बदललेला काळ म्हणजे घड्याळातील बदललेली वेळ आहे.   तसं पाहिलं तर काळ, काम आणि वेग याच्याशी ओळख आणि नंतर झटापट शाळेत असताना सहावी सातवीत झाली होती.   व्यवहारात त्याचा उपयोग असला तरी तेव्हा गणितातील मार्कांसाठी त्याचा जास्त उपयोग वाटत असे. काळ पुढे सरक...

स्मार्ट सिटी म्हणजे रे काय भाऊ ?

पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून स्मार्ट शहरांची घोषणा करण्यात आली.  यामागील हेतू अतिशय चांगला होता. पण उत्तम कल्पनेचा विचका कसा करायचा याचा हा प्रकल्प एक आदर्श नमुना म्हणता येईल.  पुणे तिथे काय उणे ! तेव्हा पुण्याची स्मार्ट शहरात वर्णी लागली हा खरे तर पुणेकरांचा अपमानच म्हणायचा.   पण त्यानंतर या उपक्रमात जे प्रकल्प पुणेकरांच्या माथी मारले त्यात एक टक्का स्मार्टनेस औषधाला सुद्धा सापडत नाही.   मुळात 'स्मार्ट सिटी'   कशाला म्हणायचे याचीच काही (सं)कल्पना तयार नव्हती.   सरकारातील काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांच्या कल्पनेचा आवाका यथा तथाच असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळे, ‘चला उठा पुणे शहर स्मार्ट करा’ म्हटल्यावर (वर्तमानपत्रातील बातम्यांवरून) असे दिसते कि अनेक दिवस अनेक अधिकाऱ्यांना नक्की काय करायचे हेच लक्षात येत नव्हते. कोणत्याही शहरातील (गावातील किंवा अगदी खेड्यातील) नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून माफक   आणि मूलभूत अपेक्षा असतात. म्हणजे प्रशस्त रस्ते, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा, उद्याने आणि बागा, कचरा व्यवस्थापन, अति...