Posts

शुभ मंगल सावधान अर्थात - सप्तपदी !

शुभ मंगल सावधान ! हे  शब्द कानावर पडले आणि मन  मोहरून गेलं. ....सगळ्याच नवरोबांचं लग्नाच्या घटिकेला असच होत. पण त्या सावधानतेचा इशारा मात्र तेव्हा ध्यानात येत नाही. लग्नाला तीन दशके झाल्यावर त्या इशाऱ्याचा गर्भितार्थ हळू हळू उमजत गेला. शुभ मंगल सावधान ! ही निव्वळ मंगलाष्टका नसून धोक्याची घंटा आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. लग्नात सप्तपदीचा विधी असतो. पूर्वीच्या काळी त्याचा संदर्भ ' सात जन्मी मी जोडीदाराला साथ देईन ' असा होता. आज त्याचा व्यापक अर्थ म्हणजे ' फक्त सात जन्मच नाही तर त्या प्रत्येक जन्मात जोडीदाराबरोबर खरेदीलासुद्धा साथ देईन ' असा झाला आहे. थोडक्यात सप्तपदीची  सात पावले ही पुढे जाऊन सातशे पावले चालण्याची निव्वळ झलक म्हणून असतात. आमच्या बाबतीत ही सातशे पावले म्हणजे मॉर्निंग (किंवा इव्हनिंग) वॉकची कधीच नसतात. एक तर माझ्या अर्धांगिनीला आहे तसा मला चालण्याचा उत्साह नाही.... आणि दुसरे कारण हे की दोघांचा चालायचा वेग व्यस्त आहे. त्यामुळे एकत्र चालायची सातशे पावले ( सप्तशतपदी ) ही बहुतेक वेळेस फक्त आणि फक्त शॉपिंगसाठीच चाललो आहे. आणि त्यातसुद्धा कसले शॉप...

काशीस जावे नित्य वदावे ! तीर्थयात्रा अर्थात पुणे मेट्रोची !

काशीस जावे नित्य वदावे ! तीर्थयात्रा अर्थात पुणे मेट्रोची !   या उक्तीनुसार , सच्चा पुणेकर एकदा तरी आपल्या स्वतःच्या ‘ पुणे मेट्रो ’ तून प्रवास करायचे स्वप्न बघतो. पुणे मेट्रो लुटुपुटुच्या मार्गावर धावायला लागून वर्ष झाले तरी हा योग जुळून आला नव्हता. १३ ऑगस्ट उजाडला आणि आम्ही सकाळी चहा घेताना ठरवून  टाकले की आज आपण मेट्रो प्रवास करूया. जगभर बस , ट्रेन , मुंबईतील लोकल ,   विमान प्रवास , परदेशातील (लंडन , शिकागो) मेट्रो , ट्राम असा प्रवास केला असूनसुद्धा पुणेकरांना पुणे मेट्रोचे कौतुक काही वेगळेच आहे. कितीही मोठ्या भाड्याच्या घरात किंवा सरकारी क्वार्टरमध्ये राहिलो तरी स्वतःचे घर झाले की माणूस कृतकृत्य होतो. एकदा मेट्रो प्रवास करायचा ठरल्यावर मेट्रोचे तिकीट कसे काढावे ? असा प्रश्न उभा राहिला. त्याचं मोबाइल ऍप आहे असे ऐकलं होत. हल्ली याकामी चि. अथर्व हाताशी असायचा.   त्यामुळे अश्या तंत्रज्ञानयुक्त कामाचा भार तोच वाहायचा. पण तो नुकताच अमेरिकेला रवाना झाल्याने , मला माझा उजवा हात निकामी झाला अस वाटून गेलं. त्याचवेळी या तांत्रिक बाबींत आपण मागे पडू लागलो की काय या भावन...

पर्यावरणाची दुसरी (की दुखरी) बाजू !

How Dare You ! –  Greta Thunberg संयुक्त राष्ट्रांत त्वेषाने फेकलेलं हे वाक्य काही क्षणात जगभर जाऊन पोहोचल आणि पर्यावरणवाद्यांचे जणू लाडके घोषवाक्य झाले.. अगदी   ‘ मार्टिन ल्युथर किंग ’ याच्या " I have a Dream!" हे कृष्णवर्णीय चळवळीचे ध्येयवाक्य बनले तसेच ! ' ग्रेटा थनबर्ग ' या शाळकरी मुलीने आधी मायदेशी (स्वीडनमध्ये) पर्यावरणाच्या रक्षणासाठी दिलेला एकाकी लढा आणि नंतर संयुक्त राष्ट्रांत जाऊन दिलेले त्वेषपूर्ण भाषण याद्वारे पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे संपूर्ण जगाच लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी झाली. 'माझे आणि माझ्यासारख्या करोडो तरुणांचे भविष्य हवामान बदलामुळे धोक्यात आले आहे' यासाठी तिने विविध राष्ट्रे , त्यांचे जागतिक नेते आणि त्यांच्या धोरणांना दोष दिला. “ तुमची हिम्मतच कशी होते आमच्या भविष्याशी खेळायची ?” हा तिचा प्रश्न होता! औद्योगिकरणानंतर गेल्या तीनशे वर्षात बेसुमार जंगलतोड , शहरातील काँक्रीटची जंगले , कारखान्यांमधून अनियंत्रित जल आणि वायुप्रदूषण यामुळे वातावरणाची अपरिमित हानी झाली आहे याबद्दल दुमत नाही. ऑस्ट्रेलियावरील ओझोनचा सुरक्षात्मक थर नष्ट ...

पिढ्यान पिढ्या!

  १९७५-७६ चे दिवस. मी चौथी पाचवीत असेन.   डोक्यावरचे केस वाढले की रविवारी आमची तीर्थयात्रा आमच्या तीर्थरूपांबरोबर जवळच्या कटिंग सलूनमध्ये ठरलेली असायची.  सर्व सलूनमधील दृश्य   जवळपास   एकसारखेच   असायचे   -   एक    आरश्याची भिंत ,   त्यापुढे ३-४ चकचकीत खुर्च्या ,  खुर्च्यांना स्वतःचे पाय ,  पाठ ,  मान असे अवयव. खुर्चीसमोर एक फळी ज्यावर पाण्याचा फवारा ,  विविध क्रीम्स ,  कंगवे ,  कात्र्या आणि ते कटिंगचे भीतीदायक मशीन! भीतीदायक अश्यासाठी की त्या मशीनने केसांच्या ऐवजी चुकून मानचं कापली जाईल का - अशी शंका यायची.      अजून लहानात गणना होत असल्याने त्या खुर्चीवर एक फळी आडवी टाकली जाई. त्यावर बसायची (अनावश्यक) भीती वाटायची. त्यावर बसून कटिंगच्या वेळेस न्हाव्याने हातात मशीन घेतले की ही भीती चक्रवाढ पद्धतीने चेहेऱ्याचा ताबा घ्यायची.    (सांगायला संकोच होतो पण हा सोपस्कार पूर्ण होईपर्यंत अनेकदा भोकाड सुद्धा पसरलेले आहे.) उंची पुरेशी वाढल्यावर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या फळीकडे तुच्छ नजरेने ...