शब्दांजली
प्रस्तावना
पु.
ल. जाऊन १९ वर्षे
झाली. त्यांच्या
जाण्याने मनात एक पोकळी
निर्माण झाली होती. एका
तिरीमिरीत माझ्या मनातील भावना मी लिहून काढल्या
- ती ही "शब्दांजली". मी कोणी लोकप्रिय
साहित्यिक किंवा सेलिब्रिटी नव्हतो (आजही नाहीये) की
ही कुठे छापून यावी.
ब्लॉग वगैरेचा जमाना अजून सुरु झाला
नव्हता. क्षितिजावर समाज माध्यमे उगवली
नव्हती. त्यामुळे ही शब्दांजली कुटुंबाला
दाखवण्यापुरती राहिली. आज पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त
त्याची आठवण आली आणि
ही “शब्दांजली” ब्लॉग रूपाने प्रसिद्ध करत आहे.
(८ नोव्हेंबर २०१९)
----------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दांजली
१२ जून
२००० ……….“पु. ल.” अनंताच्या प्रवासाला निघून गेले तो दिवस
! असा
प्रवास ज्याचे प्रवासवर्णन ते लिहिणार नाहीत.
गेली
कित्येक दशके तमाम मराठी
रसिकांना खदखदून हसवणारे 'पु. ल.' , जाताना
मात्र सगळ्यांचे डोळे पाणावून गेले. खरं
तर त्यांच्याविषयी लिहिणे अप्रस्तुत आहे. एक महान
लेखक - ज्याने मराठी भाषा आपल्या लेखनातून
हवी तशी खेळवली त्यांच्यावर
मी काय लिहावे ! मी त्यांच्या अगणित
चाहत्यांपैकी एक. वयाच्या
नवव्या-दहाव्या वर्षांपासून त्यांचे लेखन वाचत - नाही
त्याचे पारायण करत आलो आहे.
साहित्य आणि कलेच्या - कविता, नाटक, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, चरित्रलेखन , चित्रपटकथा, गायन, संगीत दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन,
अभिनय, काव्यवाचन, वगनाट्य
..... इतक्या प्रकारांत उत्तमोत्तम योगदान त्यांनी दिलं आहे.
पु.
लंची प्रतिभाशक्ती तर अफाट होतीच, पण त्यांचं निरीक्षणही तितकेच सूक्ष्म होते. त्यांच्या
शाब्दिक कोट्या म्हणजे जणू होम ग्राउंडवरची
बॅटींग. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे की – “व्यक्ती आणि वल्ली”, “असा मी
असा मी”, ”बटाट्याची चाळ” आदि वाचताना आपण तो प्रसंग आणि ते पात्र जगत आहोत असं वाटतं. “तुझे आहे तुजपाशी” या नाटकात जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी काकाजींच्या
संवादातुन सहज आणि सोपेपणाने सांगितलं आहे. त्यांच्या प्रवासवर्णनातून त्यांचे निरीक्षण
आणि बरोबर टिपलेली विसंगती यांचं मार्मिक दर्शन होतं.
त्यांचा
विनोद कधीच बोचरा नव्हता आणि अश्लील तर अजिबात नव्हता. त्यांचे साहित्यातील योगदान
असामान्य असूनही त्यांना “ज्ञानपीठ पुरस्कार” मिळू नये हा दैवदुर्विलास नाही का
? केवळ 'विनोदी लेखन हे पुरस्कार योग्य नाही' अशी (गैर) समजूत असल्याने ही उणीव राहिली असावी.
अर्थात त्यांच्या वाचक वर्गाचे त्यांच्यावरील अनंत प्रेम हे त्या पुरस्कारापेक्षा अधिक
व्यापक आणि मोलाचे आहे हे खरे. पु. ल.
नी एकदा म्हटलं होत की – “दोन व्यक्तींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला होता .... चार्ली चॅप्लिन आणि वॉल्ट डिस्ने !” ज्ञानपीठ पुरस्काराचे सुद्धा असेच झाले आहे. मागील
रविवारी टीव्ही वर "गुळाचा गणपती" सिनेमा लागला
होता. त्यातील पुलंचे काम बघताना अनेकदा चार्ली चॅप्लिनचा भास होत होता.
काळ
पुढे सरकत असतो..... काळ बदलत सुद्धा असतो.
या बदलत्या आणि सरकत्या कालानुरूप मला कधी कधी भीती वाटते, पुलंच्या लेखनातून
तमाम मराठी रसिकांना आतापर्यंत जो आनंद मिळाला
तो वारसा पुढे चालू राहील का ? काळ इतका बदलला आहे, आपले राहणीमान बदलले आहे
की पुढील पिढयांना “व्यक्ती आणि वल्ली”, “असा मी असामीं” आणि “बटाट्याची चाळ” हे कळेल का ? भावेल का ? आवडेल का ?
पु.
ल. गेले ……. काही दिवस आधीच याची कल्पना आली होतीही. पण तरीही मन उदास झालं जणू आप्तस्वकीयांपैकी
कोणी ते होते. त्यांच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम
पाहताना मन उदास होतं. पण पुलंची ताकद किती ते पहा - श्रद्धांजलीच्या एका कार्यक्रमात त्यांच्या नाटकातील
प्रसंग सादर केला होता. अश्या गंभीर आणि उदास मनस्थितीमध्येही नाटकातील विनोदी प्रसंगाच्या
वेळी खो-खो हसू येत होतं. पुलंना तीच खरी श्रद्धांजली होती.
'पु.
ल.' आता नाहीत हे कळत असलं तरी पटत नाही. पुलंच्या
एका पुस्तकातला प्रसंग मला याक्षणी आठवतो. P. G. वूडहाऊस हा पुलंचा आवडता विनोदी लेखक.
त्याच्याबद्दल लिहिताना पुलंनी एक किस्सा सांगितला आहे - PG ची मुलगी गेल्याची बातमी जेव्हा त्याला समजते,
तेव्हा तो सुन्न होतो. थोड्या वेळाने तो भानावर
येतो.....आणि एकच वाक्य म्हणतॊ -
" I
thought she was immortal ".
“पुलं”बद्दल
आजही नेमकं असंच वाटत आहे !
सुहास पानसरे
(२२
जून २०००)
खूप छान, मनापासून व्यक्त झालेली शब्दांजली...
ReplyDeleteSuhas Far Sunder Shabdat tuzya Bhavna ani PL chya athvani shabdankit kelya aahes.Vachun to Kal dolyasamor ubha rahila.Khup Sunder.Thanks a lot for sharing.
ReplyDeleteTuze Blog varil Lekhan khup Aavadte.Do share in future as well.Thanks & Best Wishes from .Shrikant Prabhudesai.
ReplyDeleteFarach changla lihila age Suhas. Pu La n baddal tyana chahanyara asankhya fans chya bhavna tu achook vyakt kelya ahe.
ReplyDeleteमीही एक पुलकित ! तुमच्या लेखनाशी सहमत.
ReplyDelete🙏🏼🙏🏼
Delete