Posts

बीबीसी त्यांची आणि आपली

नव्वदीच्या दशकात भारतात “इलेक्ट्रॉनिक मीडिया” क्रांती झाली. शेकडो चॅनेल्स सुरु झाले आणि त्यातील कित्येक तर फक्त बातम्यांना “वाहून” घेतलेले (म्हणूनंच   वृत्त-“वाहिनी” म्हणत असावेत). कोणतीही बातमी सर्वात आधी द्यायची स्पर्धा यातून सुरु झाली. विविध प्रकारे दर्शकांची संख्या आणि टीआरपी वाढवण्यासाठी 'ब्रेकिंग न्यूज' चा फंडा निघाला. त्याअनुषंगाने चालणाऱ्या चर्चांची गुऱ्हाळे सुरु झाली.   खरे तर स्पर्धेमुळे ग्राहकाला वेगवेगळे पर्याय तर मिळतातच पण   सेवेचा दर्जा उंचावतो. पण असे न होता ब्रेकिंग न्यूज आणि त्यावरील चर्चा हा एक फार्स बनला आहे. टीव्ही वर बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये जगभरात बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन) अग्रणी आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी दिल्लीबाहेर होते. त्यांच्यापर्यंत हत्येविषयी उलट सुलट माहिती जात होती. असं म्हणतात कि त्यावेळी राजीव गांधीनी बीबीसीवरून बातमीची खातरजमा करून   घेतली. अशी विश्वसनीयता आज आपल्याला कोणत्या भारतीय वाहिनीविषयी वाटते ? भारतच काय, पण अमेरिकेत सुद्धा तेथील इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एकेका पक...

वारश्याची वाताहत

वर्तमानातील घटनेवरून भूतकाळात जाऊ लागलो की आपण वृद्धत्वाकडे झुकलो असं समजावं. या न्यायाने मी वृद्धत्वाकडे झुकू लागलो कि काय ही भीती वाटावी अशी बातमी कानावर आली. आर. के . स्टुडिओ मध्ये शेवटचा गणेशोत्सव साजरा झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली हे त्याचे निमित्त. माझीच काय पण त्यामागील किमान दोन पिढ्याना भरून टाकणारे खानदान.... हिंदी चित्रपसृष्टीतील प्रथम कुटुंब (first family) म्हणून मानांकित असणारे "कपूर" घराणे ! त्यांचा स्टुडिओ म्हणजे बॉलीवूडचा चालता बोलता इतिहास. अनेक तारे आणि तारका येथून उगवल्या आणि नंतर वर्षानुवर्षे चंदेरी दुनियेत चमचमत राहिल्या. तो स्टुडिओच आता इतिहासजमा होणार ? 'बॉबी' आला (की आली !) तेव्हा मला   मिसरूड सुद्धा फुटली नव्हती आणि 'राम तेरी गंगा मैली' च्या सुमारास मी हक्काने मित्रांबरोबर सिनेमा पाहू लागलो होतो. थोडक्यात सांगायचे तर माझ्यासारखे अनेक जण आर. के. च्या प्रवाहाबरोबर वाहत मोठे   झालो. पुण्याहून आजोळी मुंबईला जाताना आर. के. स्टुडिओ चा स्टॉप आला म्हणजे आपण मुंबईत शिरलो अशी पक्की खूणगाठ होती. त्याच्या   प्रवेशद्वारावर ते सुप्रसिद्ध युगुला...