शब्दांजली
प्रस्तावना पु . ल . जाऊन १९ वर्षे झाली . त्यांच्या जाण्याने मनात एक पोकळी निर्माण झाली होती . एका तिरीमिरीत माझ्या मनातील भावना मी लिहून काढल्या - ती ही " शब्दांजली ". मी कोणी लोकप्रिय साहित्यिक किंवा सेलिब्रिटी नव्हतो ( आजही नाहीये ) की ही कुठे छापून यावी . ब्लॉग वगैरेचा जमाना अजून सुरु झाला नव्हता . क्षितिजावर समाज माध्यमे उगवली नव्हती . त्यामुळे ही शब्दांजली कुटुंबाला दाखवण्यापुरती राहिली . आज पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याची आठवण आली आणि ही “ शब्दांजली” ब्लॉग रूपाने प्रसिद्ध करत आहे . (८ नोव्हेंबर २०१९) ---------------------------------------------------------------------------------------------------------------- शब्दांजली १२ जून २००० ……….“ पु . ल .” अनंताच्या प्रवासाला निघून गेले तो दिवस ! असा प्रवास ज्याचे प्रवासवर्णन ते लिहिणार नाहीत . गेली कित्येक दशके तमाम मराठी रसिकांना खदखदून हसवणारे ' पु . ल .' , जाताना मात्र सगळ्यांचे डोळे ...