स्मार्ट सिटी म्हणजे रे काय भाऊ ?
पाच
वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून स्मार्ट शहरांची घोषणा करण्यात आली. यामागील हेतू अतिशय चांगला होता. पण उत्तम कल्पनेचा विचका कसा करायचा याचा हा प्रकल्प एक आदर्श नमुना म्हणता येईल.
पुणे तिथे काय
उणे ! तेव्हा पुण्याची स्मार्ट शहरात वर्णी लागली हा खरे तर पुणेकरांचा अपमानच म्हणायचा. पण त्यानंतर या उपक्रमात जे प्रकल्प पुणेकरांच्या
माथी मारले त्यात एक टक्का स्मार्टनेस औषधाला सुद्धा सापडत नाही. मुळात 'स्मार्ट सिटी' कशाला म्हणायचे याचीच काही (सं)कल्पना तयार नव्हती. सरकारातील काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांच्या
कल्पनेचा आवाका यथा तथाच असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळे, ‘चला उठा
पुणे शहर स्मार्ट करा’ म्हटल्यावर (वर्तमानपत्रातील बातम्यांवरून) असे दिसते कि अनेक
दिवस अनेक अधिकाऱ्यांना नक्की काय करायचे हेच लक्षात येत नव्हते.
कोणत्याही
शहरातील (गावातील किंवा अगदी खेड्यातील) नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून माफक आणि मूलभूत अपेक्षा असतात. म्हणजे प्रशस्त रस्ते,
नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा, उद्याने आणि बागा, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण न झालेले
पदपथ आणि अशा अनेक साध्या साध्या गोष्टीत नागरिक समाधानी असतात. किंबहुना स्मार्ट कल्पनेची
ही पहिली आणि मूलभूत पायरी आहे. त्यापुढील
पायरी म्हणजे, समाजातील सर्व घटकांचा विचार करून, वृद्ध आणि अपंग व्यक्तींना सुखकर
होईल अशी व्यवस्था करणे. विविध कामे स्थानिक
पातळीवर कशी होतील अशा सुविधा निर्माण करणे (बहू-उद्देशीय कार्यालय). त्यापुढे जाऊन विविध प्रकारची माहिती किंवा सेवा
सहजपणे उपलब्ध करून देणे ही स्मार्टपणाकडे नेणारी वाट असेल.
गेल्या
दोन-तीन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला तर काय दिसून येतं ! आमच्या औंध - बाणेरचा ‘स्मार्ट’ विकास
बघितला तर या बाबी ठळकपणे दिसतात. ठराविक चौकात सिग्नल च्या बाजूला उंच खांबावर
LED स्क्रीन लावण्यात आले. या LED स्क्रीनवर तद्दन व्यावसायिक जाहिराती आणि काही उपदेशात्मक
संदेश दिले जातात. सिग्नलसाठी थांबल्यावर याकडे कोणाचे लक्ष जात असेल ? अशा फलकांवर पुढील रहदारीची माहिती दाखवून कुठे
रहदारी तुंबली आहे आणि त्याऐवजी पर्यायी कोणता रस्ता हे जर समजले तर सर्वांना त्याचा
उपयोग होईल. इंग्लंडला असताना मी तेथील हायवेवर
प्रवास करताना ५० मैल पुढे अपघात झाला असून
वाहनांच्या दोन कि मी लांब रांगा लागल्या आहेत अशी माहिती अशाच फलकावर मला दिसली. अपघातग्रस्त
ठिकाणाजवळ मी बहुतेक वेळेस कॉफी ब्रेक घेत असे. पण वरील माहिती पाहून मी त्या ट्रॅफिकमध्ये
अडकण्याऐवजी आधीच ब्रेक घेतला, आणि मग पुन्हा मार्गस्थ झालो. या माहितीमुळे मीही ट्रॅफिक मध्ये अडकलो नाही आणि
माझ्यासारखे अनेक जण तिथे जाऊन त्यांनी त्यामध्ये भर घातली नाही. हा स्मार्टपणाचा साधा
नमुना नाही का ?
दुसरा
प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे आधीचे फूटपाथ तुडवून उखडून तिथे त्यापेक्षा अधिक रुंदीचे केले
आहेत. त्यावर 'टाकाऊतून टिकाऊ ' तत्वावर काही शिल्प आणून ठेवली आहेत. थोड्याच दिवसात ती परत टाकाऊ होतील अशी भीती वाटू
लागली आहे. यात कसला स्मार्टपणा आहे ते ब्रह्मदेवच
जाणे. किंबहुना तुम्ही जर हा फूटपाथ पाहायला
आलात तर ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ‘रस्ता लहान पण फूटपाथ महान’. लहान रस्त्यामुळे
रहदारी तर संकोचून जातेच पण वाहने उभी करायला
काय - चालवायला सुद्धा पुरेशी रुंदी नाही. अशा ठिकाणी रहदारीचा रोज बोजवारा उडलेला दिसतो. अशा प्रशस्त पदपथावर यथावकाश डोसा, चहा, भेळ, वडा पाव यांच्या गाड्या लागल्या आहेत.
स्मार्ट न होता हा परिसर बकाल होत चालला आहे.
चौकामध्ये
तर या स्मार्टपणाचा कहर केलेला दिसतो. सिग्नल नंतर रहदारी जलद गतीने पुढे जावी यासाठी
प्रत्यक्ष चौकात पदपथ निमुळते होऊन रस्ता अजून प्रशस्त होणे आवश्यक असते. त्याउलट प्रशस्त
पदपथांमुळे आणि अरुंद रस्त्यामुळे चौकात वाहने वळवताना कसरत करावी लागते. अनेक दुचाकीस्वार
रस्त्यावरून जाण्याऐवजी चक्क पदपथांचा उपयोग करू लागले आहेत. बरे या पदपथांची ऊंची एकसमान असेल असेही नाही. परदेशात पदपथांची ऊंची मर्यादित आणि एकसमान असते - जेणेकरून वाहने त्याकडे तोंड
करून लावताना वाहनाचा खालचा भाग त्याला घासणार नाही. खरे तर या किमान बाबी असून त्याकडे कानाडोळा होतो
आणि स्मार्टच्या नावाखाली अतिशय दिखाऊ प्रकल्प माथी मारले जात आहेत.
सार्वजनिक
वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा स्मार्ट शहराचा अविभाज्य घटक आहे. शहराचा विस्तार, आकार-उकार
पाहून त्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित होणे गरजेचे आहे. मुंबईचा उत्तर - दक्षिण विस्तार पाहता, त्यानुसार
लोकल सेवा आणि पूर्व पश्चिम जोडणारी मेट्रो आणि बस सेवा उपयुक्त आहेत. पुण्यासारख्या
वर्तुळाकार पसरलेल्या शहराला तसेच (वर्तुळाकार) रस्त्यांचे आणि मेट्रोचे जाळे योग्य
आहे. अन्यथा ठराविक रस्त्यांवर नेहेमीच रहदारीचा ताण येतो. शहरातील कोणत्याही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
कमीत कमी अंतरात आणि वेळेत जाता आले तर तो स्मार्टपणा सगळ्यांना आवडेल.
एकंदरीत काय, स्मार्ट
शहर ही कल्पना कितीही आकर्षक असली तरी त्याच्या अंमलबजावणीत दूरगामी आणि मूलभूत विचार
नसल्याने हा प्रकल्प शोभेचा आणि निव्वळ दिखाऊ ठरला आहे.
सुहास पानसरे
Its really disappointing and unfortunate to see very less space for driving vehicles , and unreasonably large footpaths.Two wheeler drivers drive their bikes on the footpaths to fight the problem of traffic congestion....
ReplyDeleteWhom to blame ? These drivers or to the stupid planning authority who made n exicuted the plan , at the coat of sincere tax payers ...
My blood boils to see the road scene every day -
Unhygenic food stuff served ,and ( the smart...???)people are happily consuming the unhealthy food and making the road ugly by throwing rubbish on the road .
Very aptly observed and commented. Very nice
ReplyDeleteIts really disappointing and unfortunate to see very less space for driving vehicles , and unreasonably large footpaths.Two wheeler drivers drive their bikes on the footpaths to fight the problem of traffic congestion....
ReplyDeleteWhom to blame ? These drivers or to the stupid planning authority who made n exicuted the plan , at the coat of sincere tax payers ...
My blood boils to see the road scene every day -
Unhygenic food stuff served ,and ( the smart...???)people are happily consuming the unhealthy food and making the road ugly by throwing rubbish on the road .
Totally agree. We collectively are smart in making mockery of good intentioned programs
ReplyDelete