Posts

पिढ्यान पिढ्या!

  १९७५-७६ चे दिवस. मी चौथी पाचवीत असेन.   डोक्यावरचे केस वाढले की रविवारी आमची तीर्थयात्रा आमच्या तीर्थरूपांबरोबर जवळच्या कटिंग सलूनमध्ये ठरलेली असायची.  सर्व सलूनमधील दृश्य   जवळपास   एकसारखेच   असायचे   -   एक    आरश्याची भिंत ,   त्यापुढे ३-४ चकचकीत खुर्च्या ,  खुर्च्यांना स्वतःचे पाय ,  पाठ ,  मान असे अवयव. खुर्चीसमोर एक फळी ज्यावर पाण्याचा फवारा ,  विविध क्रीम्स ,  कंगवे ,  कात्र्या आणि ते कटिंगचे भीतीदायक मशीन! भीतीदायक अश्यासाठी की त्या मशीनने केसांच्या ऐवजी चुकून मानचं कापली जाईल का - अशी शंका यायची.      अजून लहानात गणना होत असल्याने त्या खुर्चीवर एक फळी आडवी टाकली जाई. त्यावर बसायची (अनावश्यक) भीती वाटायची. त्यावर बसून कटिंगच्या वेळेस न्हाव्याने हातात मशीन घेतले की ही भीती चक्रवाढ पद्धतीने चेहेऱ्याचा ताबा घ्यायची.    (सांगायला संकोच होतो पण हा सोपस्कार पूर्ण होईपर्यंत अनेकदा भोकाड सुद्धा पसरलेले आहे.) उंची पुरेशी वाढल्यावर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या फळीकडे तुच्छ नजरेने ...

अस्पृश्य राजकारण

"आपल्या ग्रुपवर राजकीय पोस्ट्स नको!" गेल्या महिन्यात   माझ्या    व्हॉट्सअपच्या   दोन ग्रुप्सवर   काही दिवसांच्या अंतरात   या   आशयाच्या पोस्ट्स आल्या.    आज समाजमाध्यमे आपली अविभाज्य अंग झाली आहेत .  कर्णाला जशी जन्मजात कवच - कुंडले होती तसेच आपल्या जन्माच्या वेळीच परमेश्वराने प्रत्येकाचे   ‘ इंस्टाग्राम ’, ‘ फेबु ’,    ‘ व्हॉट्सअप ’  खातं त्याच्या प्रारब्धाला जोडूनच पाठवले की काय असं वाटतं. या समाज माध्यमातून आपण उत्स्फूर्तपणे ,  मुक्तपणे व्यक्त होत असतो. व्हॉट्सअप वर अनेक ग्रुपवर आपण सभासद असतो आणि एका क्लिकसरशी आपला संदेश कित्येक जणांपर्यंत पोहोचवतो. हे ग्रुप्स पण अनेक प्रकारचे असतात. विशिष्ट धाग्याने गुंफलेले - समान राजकीय विचारसरणीचे ,  एखाद्या विषयाला वाहिलेले   ( पु ल प्रेमी ,  संगीतप्रेमी   -  अगदी   ‘ मराठी सिरियलला वैतागलेला ’   सुद्धा एक ग्रुप असल्याचे मला माहित आहे ) . अनेक ग्रुप कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचे असतात. अश्या ग्रुपमध्ये कौटुंबिक ,  साहित्य ,  ...

।।ग्राहक देवो भव ।।

दैनंदिन जीवनातल्या लहान-सहान प्रसंगातील विसंगती खुमासदार पद्धतीने दाखवून देण्यामध्ये ‘ पुलं ’ चा हात कोणीच धरू शकणार नाही .   "दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक! ' अशी पुणेकरांची खासियत त्यांनी सांगितली आहे. या अनुषंगाने पुणेरी दुकानदारांवर अनेक किस्से प्रसिद्ध झाले. फक्त पुणेच का - संपूर्ण भारत देशातच ग्राहक हा देवासमान आहे ही वृत्ती अभावानेच दिसे. इंग्लंड-अमेरिकेत किरकोळ चूक झाली तरी ग्राहकाला भरघोस भरपाई मिळते हे भारतात नवलाईने सांगितले जायचे. तिकडे प्रवास आणि निवास केल्यावर याचा अनेकदा प्रत्यक्ष अनुभव आला. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा काळ बदलला आहे. ( "बदलता काळ" या माझ्या सुरुवातीच्या लेखात मी याबद्दल लिहिले आहे ) .  या बदलत्या काळाचं एक परिमाण म्हणजे आपल्याकडे बदललेली ग्राहकाभिमुखता! पुण्याच्या अनेक मानदंडांपैकी एक म्हणजे ' चितळे बंधू मिठाईवाले '! दुपारी '१ ते ४ दुकान बंद' यावरून आजही अनेक कोट्या केल्या जातात (आता चितळ्यांचे दुकान दुपारी बंद नसले तरी). ‘ आमची कोठेही शाखा नाही ’ अशी शेखी मिरवायचे दिवस मागे पडले . आ...

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

  जून १९७६:   "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही.   परत थोड्यावेळाने फोन करा...."   जून २०२१:   "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही.   परत थोड्यावेळाने फोन करा...."   फोनच्या दोन कॉलमधे तब्बल ४५ वर्ष अंतर असूनसुद्धा भारतात फोनवर तोच संवाद ऐकू येतो (किंबहुना ऐकू येत नाही!). म्हणजे ४५ वर्षात काहीच सुधारणा किंवा बदल झाला नाही असं नाही. आज स्मार्टफोन घराघरात शिरला आहे. पण ४५ वर्षांपूर्वी, स्मार्टफोनचा मूळपुरुष - स्थितप्रज्ञासारखा एका जागी स्थिर असलेला - दणकट काळा फोन अजून घराघरात शिरला नव्हता. वीस-तीस घरांच्या वसाहतीत हा एखाद्याकडे विराजमान झालेला असायचा. सगळ्यांचे फोन आणि निरोप यावरून यायचे.   कनेक्शन न मिळणे, चुकीचा नंबर लागणे असे रंग-ढंग तो दाखवायचा. सगळ्यात जास्त रुसून बसायचा तो ट्रंककॉलच्या वेळी!   एक तर टेलिफोन एक्सचेन्जकडे ट्रंककॉलसाठी नोंदणी करावी लागत असे. त्यानंतर त्यांच्याकडून कधीही कॉल येईल म्हणून, ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे ताटकळत बसावे लागे. तासनतास वाट पाहिली तरी ट्रंक कॉलची लाईन मिळा...

छंदोपनिषद !

“घेई छंद मकरंद .....प्रिय हा मिलिंद ...मधुसेवनानंद स्वच्छंद ......!”    पंडित वसंतरावांचे स्वर कानी पडत होते.   ‘छंद’ या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. नकळत भूतकाळात जाऊन आपण केलेले विविध छंद आठवले. काही बालिश तर काही स्वानंद देणारे....पण काळाच्या ओघात अलगदपणे निसटून गेलेले. १९७७-८०च्या आसपासचा तो काळ. सुट्टीतल्या छंदवर्गांचं फॅड अजून आलं नव्हतं. पण अनेक छंद आमच्या घरात घर करून असत.   माझ्या आठवणीतला माझा पहिला छंद म्हणजे पक्ष्यांची पिसे जमविण्याचा. रस्त्यात मिळण्याऱ्या पक्ष्यांच्या पिसांना फारसा भाव नव्हता. चतुःशृंगीच्या जत्रेत विविध रंगांच्या पिसांच्या टोप्या मिळायच्या. अशी टोपी म्हणजे पिसांचे घबाडचं असे. पण सगळ्यात उठून दिसणारी पिसं मिळायची ती पक्षी संग्रहालयात. लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर एक पक्षी संग्रहालय होतं. तेथील रंगीबेरंगी पक्ष्यांची पिसं मी गोळा केली होती. त्यातलंच एक सप्तरंगी पीस मला फार आवडलं होतं. शाळेत एकदा ते मित्रांना दाखवायला नेलं. कर्णिक नावाच्या मित्राने ते त्याच्या घरी नेलं. आमची परीक्षा झाली आणि मग मला त्याची आठवण आली. त्यानेसुद्धा निकालाच्य...