Posts

Showing posts from June, 2022

अस्पृश्य राजकारण

"आपल्या ग्रुपवर राजकीय पोस्ट्स नको!" गेल्या महिन्यात   माझ्या    व्हॉट्सअपच्या   दोन ग्रुप्सवर   काही दिवसांच्या अंतरात   या   आशयाच्या पोस्ट्स आल्या.    आज समाजमाध्यमे आपली अविभाज्य अंग झाली आहेत .  कर्णाला जशी जन्मजात कवच - कुंडले होती तसेच आपल्या जन्माच्या वेळीच परमेश्वराने प्रत्येकाचे   ‘ इंस्टाग्राम ’, ‘ फेबु ’,    ‘ व्हॉट्सअप ’  खातं त्याच्या प्रारब्धाला जोडूनच पाठवले की काय असं वाटतं. या समाज माध्यमातून आपण उत्स्फूर्तपणे ,  मुक्तपणे व्यक्त होत असतो. व्हॉट्सअप वर अनेक ग्रुपवर आपण सभासद असतो आणि एका क्लिकसरशी आपला संदेश कित्येक जणांपर्यंत पोहोचवतो. हे ग्रुप्स पण अनेक प्रकारचे असतात. विशिष्ट धाग्याने गुंफलेले - समान राजकीय विचारसरणीचे ,  एखाद्या विषयाला वाहिलेले   ( पु ल प्रेमी ,  संगीतप्रेमी   -  अगदी   ‘ मराठी सिरियलला वैतागलेला ’   सुद्धा एक ग्रुप असल्याचे मला माहित आहे ) . अनेक ग्रुप कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचे असतात. अश्या ग्रुपमध्ये कौटुंबिक ,  साहित्य ,  ...